Mumbai News खडकपाडा येथील फर्निचरच्या 5 ते 6 गोदामांना भीषण आग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mumbai News खडकपाडा येथील फर्निचरच्या 5 ते 6 गोदामांना भीषण आग

Share This

मुंबई - गोरेगाव पूर्व परिसरात भीषण आगीची घटना समोर आली आहे. मालाडच्या खडकपाडा येथील फर्निचरच्या 5 ते 6 गोदामांना आग लागली. एका फर्निचरच्या गोदामाला आग लागल्यानंतर अवघ्या काही क्षणांत ही आग इतरही गोदामांमध्ये पसरली आहे. प्राथमिक माहितीनूसार आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्व  खडकपाडा परिसरातील एका फर्निचरच्या गोदामाला सकाळी साडे अकराच्या सुमारास आग लागली. काही कळायच्या आत ही आग आसपास असलेल्या चार ते पाच गोदामांपर्यंत पोहोचली. गोदामात लाकडी साहित्य असल्याने आगीचा मोठा भडका उडत होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे. ही आग लेव्हल 3 ची म्हणजेच भीषण झाल्याचे सांगण्यात आले आहे. 

या आगीच्या घटनेत जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच नेमकी आग कशामुळे लागली, याचीही माहिती समोर आली नाही. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरू आहे. लोकांची वर्दळ असलेल्या खडकपाडा परिसरात ही आग लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिवाय ही आग इतरही दुकानांपर्यंत पोहोचू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages