मुदत ठेवी, देणी याविषयी मुंबई पालिकेने श्वेतपत्रिका काढावी - आमदार रईस शेख - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुदत ठेवी, देणी याविषयी मुंबई पालिकेने श्वेतपत्रिका काढावी - आमदार रईस शेख

Share This

 

मुंबई - आपल्या आगामी अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महापालिकेने मुदत ठेवींसंदर्भात (एफडी) श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. यामध्ये महापालिकेने मोडलेल्या मुदत ठेवी, चालू मुदत ठेवी तसेच सुमारे दोन लाख कोटीचे दायित्वांची याचाही समावेश करावा.

आमदार शेख यांनी पालिकेला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, बीएमसीचे आर्थिक दायित्व सुमारे दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. हे पालिकेच्या इतिहासात अभूतपूर्व असेच आहे. मुंबई महापालिका विविध प्रकल्पांना निधी पुरवण्यासाठी आपल्या मुदत ठेवी मोडत असून त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीबद्दल मुंबईकरांमध्ये अतिशय काळजीचे वातावरण आहे.

बीएमसीने त्यांच्या मुदत ठेवींवर (एफडी) श्वेतपत्रिका सादर करणे आवश्यक आहे. श्वेतपत्रिकेमध्ये ३१ मार्च २०२४ रोजी असणाऱ्या मुदत देवी आणि ३१ डिसेंबर २०२४ रोजी असणाऱ्या मुदत ठेवी याचा रकमेसह तपशील देण्यात यावा. तसेच मुदत ठेवी मोडण्याची कारणे, मोडलेल्या मुदत ठेवींची संख्या, त्यांच्या तारखा आणि रकमांची माहिती श्वेतपत्रिकेत असायला हवी. त्यासोबत चालू आर्थिक वर्षासाठी महापालिकेच्या ठेवींचे संपूर्ण विवरणही त्यामध्ये द्यावे, अशी मागणी आमदार शेख यांनी केली आहे.

बीएमसीची वचनबद्ध दायित्वे, मुदत ठेवींमधील रक्कम, गेल्या दोन वर्षांतील अंतर्गत कर्जे, दायित्वांची परतफेड करण्याची योजना आणि महापालिकेचे भविष्यासाठी एकूण आर्थिक व्यवस्थापन यासदंर्भातली सर्व माहिती मुंबईकरांना कळणे हा त्यांचा हक्क आहे, असा दावा रईस शेख यांनी केला आहे.

मुंबईकरांची पालिकेविषयीची अर्थचिंता दूर करण्यासाठी आशियातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएमसीने त्यांच्या एकुण दायित्वांच्या स्थितीबद्दल सर्व तो तपशील समोर आणला पाहिजे. पालिका प्रशासनाने पुरेशा आर्थिक उपाययोजना इतक्यात न केल्यास बीएमसी मोठ्या कर्जाच्या सापळ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे, अशी भिती आमदार रईस शेख यांनी आपल्या पत्रामध्ये व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages