आरोग्य मंत्र्यांनी केली वरळीच्या कामगार विमा रूग्णालयाची अचानक पाहणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आरोग्य मंत्र्यांनी केली वरळीच्या कामगार विमा रूग्णालयाची अचानक पाहणी

Share This



मुंबई - राज्य कामगार विमा सोसायटीच्या माध्यमातून कामगारांच्या वैद्यकीय सेवेसाठी रूग्णालये कार्यरत आहेत. या रूग्णालयांच्या माध्यमातून विमा काढलेल्या कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आग्रही आहेत. या रूग्णालयांच्या आढावाही त्यांनी घेतला आहे. वरळी येथे मुख्य वर्दळीच्या भागातही सोसायटीचे रूग्णालय आहे. या रूग्णालयाला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज अचानक भेट देत येथील सुविधांची पाहणी केली.  

राज्यातील कामगारांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने राज्य कामगार विमा महामंडळाने ईएसआयसी रूग्णालयांची निर्मिती केली आहे.  परंतु या ठिकाणी सेवा सुविधा मिळणे बाबत अडचणी येत असल्याच्या बाबी निदर्शनास आल्या. त्यामुळे आज वरळी येथील रूग्णालयाची अचानक भेट देत मंत्री आबिटकर यांनी पाहणी केली. हॉस्पिटलला आवश्यक असलेले सर्व सेवा सुविधा देणेबाबत आपण कटिबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पाहणी केल्यानंतर दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देशही दिले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages