मुंबई - मुंबई शहरातील मस्जिद बंदर येथील पन्न अली मॅन्शनला आज (16 फेब्रुवारी) पहाटे आग लागली. या आगीत श्वसनाचा त्रास झाल्याने 4 जणांना जे जे आणि जी टी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. (Two people died in a fire at Masjid Bandar)
मिळालेल्या माहितीनूसार, आज रविवारी सकाळी सहाच्या सुमारास इसाजी स्ट्रीट 41/43, पन्न अली मॅन्शन, वडगडी, राम मंदिराजवळ, मस्जिद बंदर येथील ग्राउंड प्लस 11 मजल्यावरील हाय-राईज इमारतीच्या तळमजल्यावरील कॉमन पॅसेजमधील इलेक्ट्रिक वायरिंगला आग लागली. आगीमुळे इमारतीमुळे धूर पसरला. इलेक्ट्रिक वायरिंग, कॉमन मीटर बॉक्समधील इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स जळाली.
पहिल्या मजल्यावरील पॅसेजमधील दोन महिलांच्या हाताला आणि पायांना दुखापत झाली, धुरामुळे त्यांना गुदमरल्यासारखे झाले. दोन्ही महिलांना पोलीस मोबाईल व्हॅनमधून जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. या दोघींचा मृत्यू झाला. धुरामुळे सहाव्या मजल्यावरील एका पुरुषाला खासगी वाहनातून जेजे रुग्णालयात नेण्यात आले. तसेच आठव्या मजल्यावर असलेल्या एका महिलेचा धुरामुळे गुदमरल्यानं तिला खासगी रुग्णवाहिकेतून जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं. या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
मृतांची नावे -
साजिया आलम शेख- महिला /30 वर्षे
सबिला खातून शेख- महिला / 42 वर्षे
जखमींची नावे -
करीम शेख- पुरुष /20 वर्षे
शाहीन शेख - महिला /22 वर्षे
No comments:
Post a Comment