राज्यातील शाळांना CBSE पॅटर्न लागू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यातील शाळांना CBSE पॅटर्न लागू

Share This

मुंबई - राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना शैक्षणिक वर्ष 2025-2026 वर्षापासून सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढील लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. 

राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली का? असा प्रश्न भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता. त्यावर, सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करुन दिली जाणार असून 1 एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचे उत्तर दादा भुसे यांनी दिले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रालयातील सर्वच विभागांसाठी 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला होता. त्या बैठकीत शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पाऊले उचलावीत, राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना केल्या होता. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages