पालिकेच्या वुलनमिल ‘आयसीएसई’ शाळेचा दहावीचा १०० टक्के निकाल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या वुलनमिल ‘आयसीएसई’ शाळेचा दहावीचा १०० टक्के निकाल

Share This

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वुलनमिल ‘आयसीएसई’ मंडळाच्या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक ३० एप्रिल २०२५) या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सन २०२०-२१ मध्ये जी उत्तर विभागात मुंबई पब्लिक स्कूल वुलनमिल ही ‘आयसीएसई’ मंडळाची शाळा सुरू करण्यात आली. सदर शाळेत आयसीएसई मंडळाच्या नियमावलीनुसार अभ्यासक्रम सुरू आहे. सन २०२४-२५ मध्ये सदर शाळेत इयत्ता १० वी चा वर्ग होता. त्यामध्ये एकूण २७ विद्यार्थी इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ७ विद्यार्थी ८१ टक्के व त्याहून अधिक श्रेणीत उत्तीर्ण झाले. युवश्री सर्वानन या विद्यार्थिनीने ९३.०२ टक्के व अर्पित यादव या विद्यार्थ्याने ९१.०८ टकके गुण प्राप्त केले. मुंबई पब्लिक स्कूल वुलनमिल आयसीएसई मंडळाच्या शाळेचा इयत्ता १० वी चा १०० टक्के निकाल लागला आहे. 

यासर्व विद्यार्थ्यांना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती वखारिया आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages