डाॅ. आंबेडकर जयंतीनिमित्त भीम आर्मीचे एक वही एक पेन अभियान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डाॅ. आंबेडकर जयंतीनिमित्त भीम आर्मीचे एक वही एक पेन अभियान

Share This

मुंबई - महामानवाला हारफुलांऐवजी वह्या पेन पुस्तकांची मानवंदना या एक वही एक पेन अभियानांतर्गत भीम आर्मी मुंबई प्रदेशच्या वतीने चेंबूर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुतळ्याच्या मागे  शैक्षणिक साहित्य संकलन केंद्र दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी उभारण्यात येणार आहे.

आंबेडकरी जनतेने आपले आणलेले शैक्षणिक साहित्य सदर मंडप केंद्रात द्यावे असे आवाहन भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरूड यांनी केले आहे.यासोबतच भीम आर्मीच्या वतीने आंबेडकरी जनतेसाठी चहापान बिस्कीट नाश्ता आदींचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना या उपक्रमासाठी योगदान देण्याची इच्छा आहे त्यांनी 
संपर्कासाठी 88509 08933, 98207 78951 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गरूड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages