BEST कंडक्टरने प्रवाशाच्या कानाखाली लगावली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

BEST कंडक्टरने प्रवाशाच्या कानाखाली लगावली

Share This

मुंबई - BEST बसमध्ये प्रवास करताना व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा राग आल्यामुळे चिडलेल्या कंडक्टरने व्हिडिओ बनवणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाच्या थेट कानशिलात लगावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

ही घटना नेमकी कोणत्या मार्गावर आणि कोणत्या क्रमांकाच्या बेस्ट बसमध्ये घडली याची माहिती सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने दिलेली नाही. मात्र, ३५ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये कंडक्टर आणि एका प्रवाशामध्ये काही कारणावरुन वाद सुरू असल्याचे स्पष्ट दिसते. 'तुला मी बसमधून उतर बोलतच नाही', असे कंडक्टर त्या प्रवाशाला सुनावतो आणि मागील दरवाजाजवळ येताना दिसतो. त्याचवेळी व्हिडिओ रेकॉर्ड करणारा अन्य प्रवासी, 'पण का उतरायचंय' असं कंडक्टरला वारंवार विचारतो. कंडक्टर काही उत्तर देत नाही तेव्हा तो कंडक्टरला हात लावून पुन्हा तोच प्रश्न विचारतो. त्यावर कंडक्टर इतका चिडतो की मागे वळून क्षणार्धात कसलाही विचार न करता तो त्या प्रवाशाच्या कानाखाली लगावतो आणि 'व्हिडिओ शूटिंग मत कर', असा धमकीवजा इशारा देतो आणि मोबाइलही खेचण्याचा प्रयत्न करतो. या प्रकारामुळे काही प्रवासी चिडतात. त्याचवेळी अन्य एक प्रवासी मध्यस्थी करत कंडक्टरला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि अन्य प्रवाशांना 'तुम्हाला काय करायचंय ते करा' असे सांगतो. त्यावर, तिकीट असूनही कंडक्टर उद्धट बोलत असल्याचा खुलासा दुसरा प्रवासी करतो, तेव्हाही कंडक्टर 'बडबड करु नकोस, शांत बस' असे ओरडतो आणि त्याला बोलू देत नाही.

व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याने कंडक्टरवर त्वरीत कारवाईची मागणी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नितेश राणे आणि मुंबई पोलीस यांना टॅग केले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्या पोस्टला उत्तर देत, 'संबंधित प्रवाशाने सर्वात जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी', असे सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages