Mock drills - मुंबईत पुढील पाच ते सहा दिवस विभागनिहाय मॉक ड्रिल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mock drills - मुंबईत पुढील पाच ते सहा दिवस विभागनिहाय मॉक ड्रिल

Share This

मुंबई - पुढील पाच ते सहा दिवस विभागनिहाय मॉक ड्रिल सुरु राहणार आहे. तसेच वेगवेगळ्या विभागात ब्लॅक आऊट करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस महासंचालक (नागरी संरक्षण दल) प्रभात कुमार यांनी दिली. मॉकड्रिल दरम्यान सर्वसामान्य लोकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

भारत सरकारच्या निर्देशानुसार ऑपरेशन अभ्यास अंतर्गत बुधवारी महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी युद्ध परिस्थिती विषयक मॉकड्रिल नागरी संरक्षण दलाच्या नेतृत्वात घेण्यात आले. या संदर्भातील माहिती मुंबई महापालिका वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रभात कुमार, मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त तथा मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापनाच्या अध्यक्ष डॉ. अश्विनी जोशी उपस्थित होत्या.

यावेळी पोलीस महासंचालक (नागरी संरक्षण दल) प्रभात कुमार यांनी माहिती देताना असे सांगितले कि, दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदानात लोकांना एकत्र करून त्यांना युद्धसदृश परिस्थितीत कसे वागावे?, याचं प्रात्यक्षिक देण्यात आले. याशिवाय तारापूर आणि गोवंडी याठिकाणी रात्री ८ वाजता ब्लॅकआउटबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर युद्धजन्य परिस्थितीकरता तयारी म्हणून मुंबईसह सिंधुदुर्ग, कल्याण व विविध ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात आले. यावेळी पोलीस, पालिका प्रशासन, मेडिकल स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, अग्निशमन दल, एनसीसी कॅडेट आणि जिल्हा स्तरावरील यंत्रणाही सहभागी झाल्या होत्या. तर मॉकड्रील दरम्यान मुंबई भागात दोन ते अडीच मिनिटे सायरन वाजला. 

मध्यंतरीच्या काळात सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम कमी झाले होते. मात्र, आता नव्याने प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये सिव्हिल डिफेन्स विभाग व मुंबई विद्यापीठात करार करण्यात आला असून अभ्यासक्रमात लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम समाविष्ट केला जाणार आहे. आणि त्यावर काम सुरु असल्याची माहिती पोलीस महासंचालक (नागरी संरक्षण दल) प्रभात कुमार यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages