रिअल टाइम वार्तांकन टाळा, प्रसारमाध्यमांना सरकारचे आवाहन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रिअल टाइम वार्तांकन टाळा, प्रसारमाध्यमांना सरकारचे आवाहन

Share This

मुंबई - पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील आतंकवादी स्थळावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व प्रसारमाध्यमे, डिजिटल व्यासपीठे आणि व्यक्तींनी रिअल टाइम वार्तांकन टाळावे असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून हे आवाहन करण्यात आले आहे. 

सर्व प्रसारमाध्यमे, डिजिटल व्यासपीठे आणि व्यक्तींना सूचित करण्यात येते की, संरक्षण विषयक मोहिमांचे तसैच सुरक्षा दलांच्या हालचालींच्या त्या त्या वेळचे (real-time) वृत्तांकन - वार्तांकन टाळावे. अशी संवेदनशील तसेच स्रोताधारित माहिती उघड केल्यास मोहिमांची परिणामकारकता धोक्यात येऊ शकते आणि जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. #KargilWar, 26/11 चा हल्ला तसेच #Kandahar अपहरण यांसारख्या या पूर्वीच्या घटनांच्या वेळीही अपरिपक्वतेने केलेल्या वृत्तांकन वार्तांकनाचे धोके अधोरेखित झालेले आहेत.

सुधारित केबल दूरचित्रवाणी प्रणाली नियम 2021 [Cable Television Networks (Amendment) Rules,]  मधील नियम 6(1)(p) नुसार दहशतवादविरोधी मोहिमांच्या काळात केवळ नियुक्त अधिकाऱ्यांकडूनच ठराविक वेळी माहिती दिली जाण्याला अनुमती आहे. सर्व संबंधित भागधारकांनी जागरूकता, संवेदनशीलता आणि जबाबदारीने वृत्तांकन - वार्तांकन करत आणि राष्ट्रसेवेतील सर्वोच्च मूल्यांची जपणूक करावे असे आवाहन केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages