पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर.. - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर..

Share This

नवी दिल्ली - भारत निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये आमदारांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे जागा रिकामी झाल्या आहेत.

गुजरात येथील कडी विधानसभा मतदारसंघात कर्सनभाई पंजाभाई सोलंकी यांच्या निधनामुळे (अनुसूचित जाती) पोट निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तर विसावदर मतदारसंघात भायाणी भूपेंद्रभाई गांधीभाई यांच्या राजीनाम्यामुळे पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. केरळ राज्यातील निलांबूर मतदारसंघात पी. व्ही. अनवर यांच्या राजीनाम्यामुळे तर पंजाबच्या लुधियाना वेस्ट मतदारसंघात गुरप्रीत बसी गोगी यांच्या निधनामुळे पोट निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगालमधील कालिगंज मतदारसंघात नासिरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे या निवडणुका घेण्यात येणार आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे..
अधिसूचना जारी होण्याची तारीख 26 मे 2025 आहे. तर नामनिर्देशन करण्याची अंतिम तारीख 2 जून 2025 आहे.  नामनिर्देशन छाननी 3 जून 2025 रोजी होणार आहे. तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 5 जून 2025 आहे. मतदान 19 जून 2025 आणि मतमोजणी 23  जून 2025 रोजी होऊन निवडणूक पूर्ण होण्याची अंतिम तारीख 25 जून 2025 अशी आहे.

सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार आहेत. मतदार ओळखीकरिता EPIC व्यतिरिक्त आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, इत्यादी 12 पर्यायी ओळखपत्रे मान्य असतील. आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी त्याची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages