मढ येथील अनधिकृत बंगल्यावर तोडक कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मढ येथील अनधिकृत बंगल्यावर तोडक कारवाई

Share This

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी (उत्तर) विभाग कार्यालयाच्या वतीने मढ येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या बंगल्यावर आज (दिनांक ५ मे २०२५) तोडक कारवाई करण्यात आली. बनावट नकाशाच्या आधारे हे बांधकाम करण्यात आले होते. 

बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त (परिमंडळ-४) भाग्यश्री कापसे आणि सहायक आयुक्त (पी उत्तर) कुंदन वळवी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. 

मढ भागातील एरंगल गावाच्या परिसरात ‘प्रीत’ नामक सदर बंगला अनधिकृतरित्या बांधण्यात आलेला होता. बनावट नकाशाच्या आधारे १५०० चौरस फूट क्षेत्रफळावर बंगल्याचे बांधकाम करण्यात आले होते हे स्पष्ट झाल्याने तोडक कारवाई हाती घेण्यात आली. १ पोकलेन आणि २ जेसीबी संयंत्राच्या सहाय्याने बंगल्याचे पाडकाम करण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages