जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी 'एसओपी' ची अंमलबजावणी करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी 'एसओपी' ची अंमलबजावणी करा

Share This

 

मुंबई - जन्म नोंदणी प्रमाणपत्र देताना प्रमाणित कार्य पद्धतीचा (एसओपी ) अवलंब केला जावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस माजी खासदार किरीट सोमय्या तसेच महसूल, आरोग्य व नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार केलेल्या प्रमाणित कार्य पद्धतीचा (एसओपी ) महसूल विभागाने वापर करावा. यापूर्वी देण्यात आलेले जन्म प्रमाणपत्र शासनाने रद्द केले असून ते परत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य, नगर विकास, महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

रद्द करण्यात आलेली सर्व जन्म प्रमाणपत्र शासनाकडे जमा करण्यासाठी कार्यवाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. तसेच यासंदर्भातील आढावा महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव प्रत्येक 15 दिवसांनी घेतील असे बावनकुळे म्हणाले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages