
मुंबई - मुंबईत मंगळवारी समुद्राला मोठी भरती आली. चार ते पाच मीटर उंच लाटा उसळल्याने समुद्राचे रौद्रस्वरूप पाहायला मिळाले. लाटा पाहण्यासाठी मुंबईकरांनी समुद्रकिना-यांवर मोठी गर्दी केली. मरीन ड्राईव्ह, जुहू, गेटवे परिसरात मुंबई पालिकेचा बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, सोमवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पावसाने थोडी उघडीप दिली आहे.
परंतु विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाचा महालक्ष्मी रेसकोर्सलाही फटका बसला होता. महालक्ष्मी रेसकोर्सला तळ्याचे स्वरूप आले. संपूर्ण मैदानात पाणी साचले. घोड्यांची शर्यत होणारा ट्रॅकही पाण्याखाली गेला आहे.
No comments:
Post a Comment