२४ ते २८ जून दरम्यान सलग ५ दिवस मोठी भरती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2025

२४ ते २८ जून दरम्यान सलग ५ दिवस मोठी भरती


मुंबई - २४ जून पासून २८ जून २०२५ पर्यंत असे सलग ५ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. तर यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीदरम्यान १९ वेळा समुद्राला मोठी भरती असणार आहे. मोठी भरती याचा अर्थ सदर भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या पावसाळ्यातील मोठ्या भरतीचा तपशिल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे.  

यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा दिनांक २६ जून २०२५ रोजी उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिना-या नजीक जावू नये, तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे. 

मोठ्या भरतीचा तपशिल खालीलप्रमाणे - 
जून २०२५
१. मंगळवार, दि. २४.०६.२०२५ सकाळी – ११.१५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५९
२. बुधवार, दि. २५.०६.२०२५ दुपारी – १२.०५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७१
३. गुरुवार, दि. २६.०६.२०२५ दुपारी – १२.५५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७५
४. शुक्रवार, दि. २७.०६.२०२५ दुपारी – ०१.४० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७३ 
५. शनिवार, दि. २८.०६.२०२५ दुपारी – ०२.२६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६४ 

जुलै २०२५
१. गुरुवार, दि. २४.०७.२०२५ सकाळी – ११.५७ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५७
२. शुक्रवार, दि. २५.०७.२०२५ दुपारी – १२.४० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६६
३. शनिवार, दि. २६.०७.२०२५ दुपारी – ०१.२० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६७
४. रविवार, दि. २७.०७.२०२५ दुपारी – ०१.५६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६०

ऑगस्ट २०२५
१. रविवार, दि. १०.०८.२०२५ दुपारी – १२.४७ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५०
२. सोमवार, दि. ११.०८.२०२५ दुपारी – ०१.१९ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५८
३. मंगळवार, दि. १२.०८.२०२५ दुपारी – ०१.५२ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५८
४. शनिवार, दि. २३.०८.२०२५ दुपारी – १२.१६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५४
५. रविवार, दि. २४.०८.२०२५ दुपारी – १२.४८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५३

सप्टेंबर २०२५
१. सोमवार, दि. ०८.०९.२०२५ दुपारी – १२.१० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५७
२. मंगळवार, दि. ०९.०९.२०२५ दुपारी – १२.४१ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६३
३. बुधवार, दि. १०.०९.२०२५ मध्यरात्री – ०१.१५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५९
४. बुधवार, दि. १०.०९.२०२५ दुपारी – १३.१५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५७
५. गुरुवार, दि. ११.०९.२०२५ मध्यरात्री – ०१.५८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५९

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS