
मुंबई - मुंबईतील मनोरंजन मैदान व क्रीडांगणे दत्तक तत्वावर खासगी संस्थांना देऊ नयेत, अशी मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि अंधेरीचे (पश्चिम) आमदार अमित साटम यांनी केली आहे. साटम यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या संदर्भात पत्र लिहिले आहे.
शहरातील झपाट्याने कमी होत असलेल्या मोकळ्या जागांचे रक्षण करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने आणलेले तात्पुरते धोरण स्थगित करावे अशीही मागणी साटम यांनी केली आहे. मोकळ्या जागांच्या देखभालीसाठी जाहिरातींच्या माध्यमातून महसूल उभारावा, असे आवाहनही आमदार साटम यांनी महापालिकेला केले आहे.
मुंबईतील मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे दत्तक तत्त्वावर देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी धोरण तयार केले होते. या धोरणानुसार अकरा महिन्याच्या कालावधीसाठी मोकळ्या जागा या खासगी संस्था, न्यास यांना देखभालीसाठी दिल्या जातात. मात्र देखभालीसाठी दिलेल्या मोकळ्या जागांबाबत नेहमी चिंता व्यक्त केली जाते. या जागा हडपल्या जाण्याची भीती आहे.

No comments:
Post a Comment