
मुंबई - कुर्ला पूर्व कामगार नगर येथे ‘माझे अधिकार माझी जबाबदारी (मर्जी)’ या सामाजिक संघटनेमार्फत ‘बेअर फूट लॉयर’ या नावाने कायदेविषयक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात माहिती अधिकार कायदा 2005 या विषयावर मार्गदर्शन शिबिर नुकतेच यशस्वीरित्या संपन्न झाले.
या शिबिरात आरटीआय कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार अनिल गलगली यांनी माहिती अधिकार कायद्याचे विविध पैलू समजावून सांगत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
यावेळी आपले विचार व्यक्त करताना अनिल गलगली म्हणाले, “माहिती अधिकार हा नागरिकांना दिलेला प्रभावी शस्त्र आहे. प्रशासनातील पारदर्शकता व जवाबदारी निश्चित करण्यासाठी या कायद्याचा सजगपणे वापर होणे गरजेचे आहे. तरुण पिढी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या कायद्याचे सखोल ज्ञान घेऊन लोकांच्या प्रश्नांसाठी लढा द्यावा.”
सदर शिबिरात एड. राजेश मचाडो, एड. नितीन पंडागळे, एड. प्राप्ती कोळी, वैष्णवी मापगावकर, ललिता अनपट तसेच मर्जी संघटनेचे प्रमुख एड. मंगेश सोनावणे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

No comments:
Post a Comment