
मुंबई - महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या दोन महिलांना मोठ्या प्रमाणात अमली पदार्थासह ताब्यात घेतले आहे. या दोघींवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
DRI अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, या दोन महिलांकडे आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारात मोठ्या किमतीचा ड्रग्सचा साठा आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांनी महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्या बॅगांची तपासणी केली असता, खेळण्यांच्या पाकिटात लपवून ठेवलेल्या २२ विटांच्या पॅकेटांमध्ये एकूण ७.९५ किलो कोकेन जप्त झाले. डीआरआयच्या एनडीपीएस फील्ड टेस्ट किटच्या चाचणीत या पावडरचा कोकेन असल्याचे पुष्टी झाले.
जप्त केलेल्या कोकेनची बाजारातील किंमत अंदाजे ७९.५ कोटी रुपये आहे. दोन्ही महिलांना काल (शुक्रवारी) न्यायालयात हजर करण्यात आले, त्यावेळी त्यांना कोठडी सुनावण्यात आली.

No comments:
Post a Comment