अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Anonymous

मुंबई, दि.17 : राज्यात 18 डिसेंबर 2016 हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्काची जाणीव व्हावी त्याची माहिती व्हावी म्हणून या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना अल्पसंख्याक विकास विभागाने परिपत्रकांद्वारे निर्गमित केल्या आहेत. 
या दिवसाच्या निमित्ताने सर्व जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्यासाठी भित्तीपत्र, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करणे,स्पर्धेतील विजेत्यांना पारिताषिके देणे याच बरोबर व्याख्यानमाला,चर्चासत्र आणि परिसंवाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेने दिनांक 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहिरनामा जाहिर केला. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, पंरपरा आदीचे संर्वधन करता यावे. यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सूचना दिल्या असून प्रतीवर्षी दि.18 डिसेंबर हा दिवस `अल्पसंख्यांक हक्क दिवस`महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत राबविण्यात येतो. सदर शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्या संकेताक 201612141106485214 असा आहे.