Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

जिल्हा युवा पुरस्काराकरिता 31 डिसेंबर 2016 पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि.17 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर कार्यालयाद्वारे सन 2016-17 या वर्षाचा जिल्हा व राज्यस्तर युवा पुरस्काराकरिता जिल्ह्यातील युवक, युवती आणि युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव दिनांक 31 डिसेंबर, 2016 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवावेत.
जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाज कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे त्यासाठी दि.26 जानेवारी, 2017 रोजी जिल्ह्या युवा पुरस्कार देण्यात येणार आहे. सन 2016-17 साठी युवक, युवती आणि संस्था यांना प्रती 1 पुरस्कार असे एकूण 3 पुरस्कार देण्यात येणार आहे.

पुरस्कार पात्रतेचे निकष : 
युवक/ युवती पुरस्कार : 1 एप्रिल, 2017 रोजी 13 वर्षे पुर्ण झाले पाहिजे, तसेच 31 मार्च, 2016 रोजी वय 35 वर्षाच्या आत असले पाहिजे. अर्जदार मुंबई शहर जिल्ह्यात सलग 5 वर्ष वास्तव्यास असला पाहिजे. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जदार सोबत जोडणे आवश्यक आहे, उदा.वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्र, चित्रफीत आणि फोटो जोडावेत. केंद्र, राज्य शासन, निम-शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांमधील प्राध्यापक/ कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

संस्था युवा पुरस्कार : संस्थेची नोंदणी झाल्यानंतर 5 वर्ष कार्यरत असावी. संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम-1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट-1950 नुसार पंजीबद्ध असावी. गुणांकनाकरिता संस्थेने केलेल्या कार्याचे वृत्तपत्र कात्रणे तसेच प्रशस्तीपत्रे, चित्रफित आणि फोटो जोडावेत.

पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 31 डिसेंबर, 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, 2 रा मजला, धारावी, सायन (प), मुंबई-17 येथे पाठवावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 022-65532373 येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Voter Information & Services

Ads Bottom