Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

जोगेश्वरीत खिचडीतून २६ विद्यार्थ्यांना विषबाधा


मुंबई । प्रतिनिधी - जोगेश्वरी येथील एका खाजगी अनुदानित शाळेत आज सकाळी वाटप करण्यात आलेल्या खिचडीतून २६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या मुलांना उपचारासाठी नजिकच्या कोकण हॉस्पिटल तसेच पालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जोगेश्वरी पूर्व येथे बालविकास मंदिर ही खाजगी अनुदानित शाळा आहे. शासनाच्या शालेय पोषण आहारअंतर्गत या शाळेतील मुलांना खिचडीचे वाटप करण्यात येते. भांडुप येथील साफाई महिला सेवा संस्था या संस्थेतर्फे गेल्या २ वर्षापासून या शाळेतील मुलांना खिचडीचे वाटप केले जाते. या संस्थेचे कांजूरमार्ग येथे किचन असून तेथे ही खिचडी तयार केली जाते .आज सकाळी नेहमीप्रमाणे १ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना सकाळी १० च्या सुमारास खिचडीचे वाटप करण्यात आले. मुलांनी ही खिचडी खाल्ली. मात्र काही क्षणातच ५ वी व ७ वीच्या विद्यार्थ्यांना मळमळ सुरु होऊन उलट्या सुरु झाल्या. तर इतर विद्यार्थ्यांनाही अस्वस्थ वाटू लागले. या घटनेमुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये एकच घबराट पसरली. खिचडी खाल्लेल्या २४ विद्यार्थ्यांना उपचारासाठी कोकण हॉस्पिटल तर २ जणांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली. या घटनेनंतर शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक व सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांनी रुग्णालयात धाव घेऊन या विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom