Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

प्रजासत्ताक दिनापासून धावणार नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन


मुंबई । प्रतिनिधी - सुट्टीचा दिवस म्हटला कि मुंबईकरांचे आणि पर्यटकांचे आवडीचे ठिकाण म्हणजे माथेरान. माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांची एक खुश खबर आहे. ती म्हणजे गेले वर्षभर बंद असलेली नेरळ ते माथेरान ही मिनी टॉय ट्रेन प्रजासत्ताक (२६ जानेवारी) दिनापासून सुरू होणार अाहे. वर्षभर मिनी टॉय ट्रेन बंद असल्याने पर्यटकांना नेरळ पासून अमन लॉज पर्यंत खाजगी गाड्यांनी ये जा करावी लागत होती. यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी होती. ३൦ ऑक्टोबरपासून अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू करण्यात आली होती. अाता २६ जानेवारीपासून ही सेवा थेट नेरळ स्थानक ते माथेरान अशी सुरू होणार आहे. मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन गांभीर्याने प्रयत्न करत होतं. त्यानुसार ४ जानेवारीला नेरळ-माथेरान मार्गावर आठ डब्यांच्या मिनी ट्रेनची सुरक्षा चाचणी रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता २६ जानेवारीपासून मिनी ट्रेन आठ डब्यांची चालवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना, पर्यटकांना आणि येथील स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनानं मार्च २०१८ पासून नेरळ ते माथेरान अशी सेवा सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. पण त्याआधीच ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे डीआरएम एस. के. जैन यांनी दिली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom