Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महापालिकेच्या शाळांमध्ये गणित व विज्ञान विषय इंग्रजीतून शिकवणार


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या मराठी व इतर भाषिक शाळा बंद होत असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यानंतर आता महापालिका शाळांमधून येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमाच्या पहिलीच्या वर्गांमध्ये गणित व विज्ञान हे दोन विषय इंग्रजीतून शिकवण्याचा निर्णय़ महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. येत्या शैक्षणिकी वर्षांपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

य़ेत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमाच्या पहिलीच्या वर्गांमध्ये मातृभाषेसह इंग्रजीला प्रथम भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सेमी इंग्लिश शाळेनंतर आता महापालिकेच्या सर्वच शाळा द्विभाषिक होणार आहेत. मातृभाषेतून शिक्षण देण्यासोबत विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे दोन विषय इंग्रजीतून शिकवले जाणार आहेत. सद्या सेमी इंग्रजीच्या माध्यमातून सध्या पालिकेच्या शाळांमधील मुलांना इंग्रजीचे धडे दिले जात आहेत. नव्या निर्णयानुसार महापालिकेच्या मराठी माध्यमांसह सर्व शाळांमध्ये इंग्रजी भाषाही शिकवण्यात येणार असल्याची माहिती एका अधिका-याने दिली.

सध्या इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रमाणामुळे मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. हे गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी शालेय धोरणातही बदल केला जात आहे. व्यवहारातले इंग्रजी भाषेचं महत्त्व लक्षात घेऊन पालकांचाही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवण्याकडे कल अधिक आहे. हे लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या इंग्रजी शाळांमधील पटसंख्या वगळता इतर माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे. महापालिकेने मराठीसह इतर प्रादेशिक माध्यमांच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरु केले आहेत. महापालिकेने २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून आतापर्यंत ७३२ शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु केले आहेत. मराठी शाळा टिकण्यासाठी मराठीबरोबरच गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीतून शिकवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मराठी व इंग्रजी भाषा पक्की होईल.असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom