क्विन्स एन क्विन्सची देशपातळीवरील सौंदर्यवतींची स्पर्धा - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 January 2018

क्विन्स एन क्विन्सची देशपातळीवरील सौंदर्यवतींची स्पर्धा


मुंबई - सुंदर स्त्रीचे व्यक्तिमत्व केवळ सौंदर्यापुरतेच मर्यादित न ठेवता तिच्यात सामाजिक मानसिकतेचादेखील प्रत्यय वेगवेगळ्या फेरींमधून व त्यातील कसोट्यांना पार करून देशपातळीवरील सौंदर्यवतींची स्पर्धा या विश्वात नावलौकिक असलेल्या एका मराठमोळ्या सुंदरीने घडवून आणण्याचा संकल्प केला आहे. क्विन्स एन क्विन्स या संस्थेच्या संस्थापिका असलेल्या वैशाली डाके-मुसळे यांनी तिचे आयोजन केले असून 27 व 28 एप्रिल 2018 या कालावधीत मुंबईत ही स्पर्धा होईल. क्विन इंडिया, प्रिन्सेस इंडिया व मिस टीन इंडिया अशा तीन पातळ्यांवर तिचे आयोजन केले गेले आहे. 

या आयोजनामागचा मुख्य हेतू हा पी – 3 या उद्दिष्टांना साकार करण्यासाठी आहे. ते म्हणजे प्रोटेक्ट, प्रेझ अँड प्रमोट गर्ल्स चाईल्ड. या सौंदर्यवतींच्या अंतर्बाह्य सुंदरतेचे परिक्षण स्वतः वैशाली मुसळे यांच्यासह ग्लोबल एलिट मिस इंटरनॅशनल, अमेरिका या संस्थेचे जेन शेफेर, सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर जोग, 2013 ची मिस इंडिया सिमरन आहुजा, व्यक्तिमत्व विकासच्या प्रशिक्षिका संगीता जेम्स, मिस्टर इंडिया 2017 विजेते दारासिंग खुराणा हे करतील. स्पर्धेच्या तयारीसाठी क्विन्सएनक्विन्सच्या मुंबईसह पुणे, मध्य प्रदेश व छत्तीसगड या केंद्रांमधून मार्गदर्शन केले जाईल. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या स्पर्धक सुंदरींना मार्गदर्शन करण्यासाठी ग्रूमिग कोच सिमरन विग असतील. गिरिजा देशपांडे या सामाजिक जागृती व व्यक्तिमत्व विकास या विषयाच्या अभ्यासक असून त्यांचे व समाजसेविका सविता गोविलकर, शिक्षण तज्ञ सुनंदा भसागरे यांचेदेखील यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. या स्पर्धेसाठी प्रायोजकत्वाची जबाबदारी क्वान्ट्म इक्विपमेंट कं.लि., इनरिच सलोन, क्विन्स सलोन अँड स्पा., ब्राईट आऊटडोअर हे घेणार आहेत.

स्पर्धेच्या ऑडिशन्स 1 फेब्रुवारीला मुंबईत होतील. त्यातून निवड झालेल्या स्पर्धकांच्या स्पर्धेची झलक 3 फेब्रुवारीला पहायला मिळेल. निवडलेल्या स्पर्धकांचा फॅशन फिएस्टा – 2018 शो देखील होईल. मिस्टर इंडिया 2017 विजेते दारासिंग खुराणा व मिसेस अर्थ इंटरनॅशनल 2015-16 व मिसेस कॉस्मिक 2017 ची विजेती टीव्ही अभिनेत्री माधुरी शर्मा हे या फॅशन शो चे परिक्षक असतील.

क्विन इंडिया स्पर्धेसाठी 21 वर्षे व त्यापुढील वयोगटातील विवाहित महिलांना सहभागी होता येईल. प्रिन्सेस इंडिया स्पर्धेसाठी 19 ते 27 वयोगटातील अविवाहित युवतींना तर मिस टीन इंडियासाठी 13 ते 19 वयोगटातील मुलींना सहभागी होता येईल. विजेत्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिस इंटरनॅशनल एलिट इन युएस, मिस इंटरनॅशनल इन युएस, मिस युनिव्हर्स इन युरोप या जून 2018 मध्ये होत असलेल्या स्पर्धेच्या ऑडिशन्समध्ये भाग घेता येईल. त्यातून या भारतीयांना आंतरराष्ट्रीय एक दर्जेदार व्यासपीट आपल्या कलागुणांना सिद्ध करण्यासाठी तसेच साकारण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

स्पर्धेच्या संयोजिका वैशाली मुसळे या अष्टपैलू व बहुआयामी व्यक्तिमत्व असून त्यांनी मुंबई विद्यापीठातून व्यवस्थापनावरील पदवी संपादन केली आहे. दोन दशकांहून अधिक काळ त्यांना कार्पोरेट क्षेत्राचा अनुभव असून पर्यटन, ज्वेलरी, मॉडेलिंग, चित्रपट, फॅशन, इव्हेन्ट मॅनेजमेंट या क्षेत्राशी त्या निगडीत आहेत. महाराष्ट्र बास्केटबॉल संघाचे कर्णधारपदही त्यांनी भूषविले असून चित्रपट निर्मात्या म्हणूनही त्यांची ख्याती आहे. अनेक फॅशन्स शो आणि आंतरराष्ट्रीय सौंदर्यवती स्पर्धेत त्यांचा सहभाग राहिला आहे. मिसेस आशिया इंटरनॅशनल ब्यूटी पिजेंट 2015 च्या मानकरी आहेत तसेच राजस्थान दिवा ब्युटी पिजेंट 2015 मध्ये परिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अनेक नामांकित संस्थांवर संचालिका म्हणूनही त्या कार्यरत आहेत. महिला सबलीकरण व महिलांचे आरोग्य या विषयावरही त्या कार्य करत आहेत.

या स्पर्धेबाबत बोलताना वैशाली मुसळे यांनी सांगितले की, हा उपक्रम म्हणजे युवतींमधील आंतरिक व बाह्य सौंदर्य यांची परिक्षा असेल. यातून एक सामाजिक संदेशदेखील जनमानसात बिंबविण्यात येणार आहे. मुली वाचवा, हा संदेश त्यानिमित्ताने अधिकाधिक प्रसारित करून सामाजिक जागृती करण्यात येईल. मुलींना शिकवा, त्यांना खेळांमध्ये तसेच कला व सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे तसेच सर्वांगीण पातळीवर त्यांचा विकास घडविण्यासाठी कार्य व्हावे, त्यासाठी समाजातील अधिकाधिक व्यक्ती, संस्था तसेच घटकांनी पुढे यावे, हे त्यातून साध्य केले जाईल, असा आम्हाला विश्वास आहे. ही स्पर्धा देशपातळीवर होत असल्यामुळे त्यातून भारतीय महिलांचा एक वेगळा ठसा जगापुढे निर्माण व्हावा, असादेखील हेतू आहे. आमच्या या उपक्रमात अनेक व्यक्ती व संस्था सहभाग देत आहेत, त्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित झाले असून एक वेगळे कार्य यानिमित्ताने साकारले जात आहे.

Post Bottom Ad