महाराष्ट्रातील ७ तुरूंग अधिकाऱ्यांना सेवा पदक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्रातील ७ तुरूंग अधिकाऱ्यांना सेवा पदक

Share This

नवी दिल्ली - देशातील ४० तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील ७ जणांचा यात समावेश आहे. तुरंगसेवेत कैद्याच्या जीवनात चांगला बदल घडुवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल सेवा पदक देण्यात येते. 

पोलीस उपअधीक्षक, पोलीस महानिरीक्षक, तुरुंग आणि सुधारात्मक सेवा कार्यालय सुनील निवृत्ती धामल यांना यावर्षीचे सेवा पदक जाहीर झाले आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार धर्मराज नामदेव नाघाटे, येरवडा कारागृहाचे सुभेदार श्री आनंद शंकर हिरवे, जालना जिल्हा कारागृहाचे हवालदार श्री जगन्नाथ पांडुरंग खपसे, कोल्हापूर जिल्हा कारागृहाचे हवालदार श्री संजय सखाराम घाणेकर, अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे हवालदार श्री गजानन दिगंबर क्षीरसागर आणि औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई श्री सुभाष तोताराम तायडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages