हज अनुदान बंद, घुसखोरांवर कारवाई कधी ? राज ठाकरेंचे 'व्यंगचित्र' - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 January 2018

हज अनुदान बंद, घुसखोरांवर कारवाई कधी ? राज ठाकरेंचे 'व्यंगचित्र'


मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी '(अनु)दान आणि (राष्ट्र)धर्म' या मथळ्याखालील व्यंगचित्र ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केले आहे. या व्यंगचित्राद्वारे राज यांनी आपल्या कुंचल्यातून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर 'ठाकरे' शैलीत फटकारे ओढले आहेत. 

मोदी सरकारने जाहीर केलेल्या हज अनुदान बंद करण्याच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया कुंचल्याच्या साहाय्याने नोंदवली आहे. अनुदान काढून घेतानाच बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशातून हाकलून देण्याचा सूचक इशारा पंतप्रधान मोदींना राज ठाकरेंनी आपल्या या व्यंगचित्रातून दिला आहे. केवळ हज यात्रेचे अनुदान बंद करुन चालणार नाही, तर देशातील अन्य मुलभूत प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यायला हवे, असा टोला ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून सरकारला लगावला आहे. व्यंगचित्रात हज यात्रेकरुच्या हातातून अनुदानाचे गाठोडे हिसकावून घेताना पंतप्रधान मोदींना दाखविण्यात आले आहे. तर भारतमाता पंतप्रधान मोदींना देशांतर्गत दहशतवादी कारवाया रोखण्याचे तसेच बांगलादेशी, पाक घुसखोरांच्या प्रश्नावरुन जाब विचारताना दिसत आहे.

Post Bottom Ad