राणीबागेतील भूमिगत टाक्यांमध्ये दिवसाला 3 लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

25 February 2018

राणीबागेतील भूमिगत टाक्यांमध्ये दिवसाला 3 लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता

मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील राणीबाग म्हणजेच वीर जिजामाता उद्यानामधील भूमिगत पाण्याच्या टाक्या बांधणे शक्य नसल्यामुळे जुन्याच पाण्याच्या स्त्रोतांचा विचार केला गेला. त्यादृष्टीने येथील पाण्याची वितरण व्यवस्था बळकट करण्यात आली आहे. पाण्याच्या पाईप लाईन जोडणीचे काम वर्षभरापूर्वीं सुरू करण्यात आले होते. हे काम पूर्ण झाले असून 15 दिवसांपूर्वी पाणी पुरवठा सुरू झाला आहे. यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे राणीबागेत दिवसाला 3 लाख लिटर पाणी उपलब्ध झाले आहे. हे पाणी झाडे आणि श्वानांसाठी वापरले जाणार आहे.

उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे (राणीबाग) नुतनीकरण करण्यात येत आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण आणि उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तसेच थायलंडमधील एच.के.एस डिझायनर अँड कन्सल्टंट इंटरनॅशनल यांनी बनवलेल्या मास्टर आराखड्यानुसार मुख्य प्रवेशद्वार, सार्वजनिक सुविधा, अंतर्गत बगीच्यांचा विकास तसेच विविध विकास कामांची यादी केली जात आहे. या मास्टर आराखड्यानुसारच नवीन पिंजरे व उद्यान, पाणी वितरण व्यवस्था तयार केली जात आहे. प्राणिसंग्रहालयात तीन पाण्याच्या विहिरी व भूमिगत टाक्यांतील पाण्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. सध्या सर्व प्लॉट्स, प्राण्यांचे पिंजरे, सार्वजनिक सुविधा यांचे नुतनीकरण करण्यात येत आहे. तसेच इंटरप्रिटेशन केंद्र इमारत, नवीन प्राणिसंग्रहालय रुग्णालय, क्वारंटाईन क्षेत्र, कला प्रवेशद्वार क्षेत्र, मफतलाल मिल कंपाऊंडचे क्षेत्र याचीही होणार आहे. त्यामुळे दैनंदिन पाण्याच्या वापरात प्रचंड वाढ होणार आहे. त्यानुसार उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे सर्वेक्षण करून भविष्यातील वाढणाऱ्या पाण्याच्या गरजेप्रमाणे पाणी वितरण व्यवस्थेचा आराखडा बनवण्यात आला. त्यानुसार विविध व्यासाच्या जलवाहिनी टाकून येथील जलवितरण व्यवस्था बळकट करण्यात आली आहे. यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. प्राण्यांसाठी नवीन पिंजरे उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

Post Top Ad

test