शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आता महिला टीसी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आता महिला टीसी

Share This
मुंबई । प्रतिनिधी - लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये महिला टीसींची नेमणूक केली जात नाही. मात्र शताब्दी एक्सप्रेसमध्ये २ महिला टीसींची प्रायोगिक तत्वावर ड्युटी लावण्यात आली होती. या महिला टीसींनी नेहमी पेक्षा जास्त उत्पन्न रेल्वेला मिळवून दिल्याने येत्या महिला दिनापासून (८ मार्च) शताब्दी एक्सप्रेसची संपूर्ण जबाबदारी महिला टीसींकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वेमध्ये महिला टीसीची नेमणूक प्लॅटफॉर्मवर केली जाते. त्यामुळे मेल, एक्स्प्रेसमधील महिला टीसींची संख्या अत्यल्प आहे. रेल्वे प्रशासनाने 5 फेब्रुवारीला शताब्दी एक्स्प्रेसमध्ये २ महिला टीसींची नेमणूक केली होती. या महिला टीसींनी या दिवशी रेल्वेचे उत्पन्न 30 हजारांवरून 50 हजारावर नेले. याकारणाने आता शताब्दी एक्प्रेसमधील तिकीट तपासणीची जबाबदारी संपूर्णपणे महिला टीसीवर दिली जाणार आहे. पश्चिम रेल्वेने महिला दिनाचं औचित्य साधून 8 मार्चपासून मुंबई -अहमदाबाद शताब्दी एक्प्रेसमध्ये संपूर्णपणे महिला टीसीचा चमू कार्यरत असणार आहे. पश्चिम रेल्वेवर पहिल्यांदाच एखाद्या एक्स्प्रेसची जबाबदारी महिला टीसीकडे सोपवण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेत सुमारे 90 महिला टीसी असून त्यात मुंबईतील महिला टीसीची संख्या 50 आहे. लवकरच मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमध्येही महिला टीसीची नियुक्ती करण्याचा विचार करण्यात येत आहे. पण, तिचा प्रवास रात्रीचा असल्याने त्यावर अद्याप निर्णय झालेला नसल्याचे समजते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages