पालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणूका १२ व १३ एप्रिलला - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

16 March 2018

पालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणूका १२ व १३ एप्रिलला


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बहुसंख्य नगरसेवकांचे लक्ष प्रभाग समित्यांच्या निवडणुकांकडे लागले आहे. नगरसेवकांचे लक्ष लागलेल्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १७ प्रभाग समित्यांच्या निवडणूका १२ व १३ एप्रिलला तर एका प्रभाग समितीची निवडणूक १९ एप्रिलला होणार आहेत. 

मुंबई महापालिकेचा कारभार सभागृह, वैधानिक व विशेष समित्यांच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहे. तर स्थानिक पातळीवर कारभार प्रभाग समित्यांच्या माध्यमातून चालवण्यात येतो. महापालिकेची २४ प्रभाग कार्यालये असून १७ प्रभाग समित्यांच्या माध्यमातून या कार्यालयांचा कारभार चालवला जातो. या प्रभाग समित्यां वर ज्या राजकीय पक्षाचे नगरसेवक जास्त त्या पक्षाचा अध्यक्ष निवडला जातो. सध्या १७ पैकी ८ प्रभाग समित्या भाजपाकडे एक प्रभाग समिती भाजपा पुरस्कृत अखिल भारतीय सेनेकडे तर शिवसेनेकडे ६ प्रभाग समित्या असून एक प्रभाग समिती शिवसेनेच्या पाठिंब्यावर मनसेकडे होती. मुंबई महापालिकेत गेल्या काही महिन्यात राजकीय उलथा पालथ झाली आहे. मनसेचे सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला याचा फायदा होणार आहे. मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांची कुर्ल्याच्या प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आता दिलीप लांडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने एल विभागाची प्रभाग समिती शिवसेनेकडे राहणार आहे. तर मनसेतून घाटकोपर येथील दोन नगरसेवक शिवसेनेत सामील झाल्याने एन विभागाची प्रभाग समिती शिवसेनेकडेच राहणार आहे. प्रभाग समित्यांसाठी ९ एप्रिलला अर्ज स्वीकारले जाणार असून एम पूर्व या एका प्रभाग समितीसाठी मात्र १६ एप्रिलला अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 

प्रभाग समिती निवडणुकीचा कार्यक्रम - 
निवडणुकीची तारीख - प्रभाग समित्यांची नावे - 
१२ एप्रिल - ए बी आणि ई, सी आणि डी, एफ उत्तर आणि एफ दक्षिण, जी दक्षिण, आर मध्य आणि आर उत्तर, आर दक्षिण, पी उत्तर, पी दक्षिण

१३ एप्रिल - जी उत्तर, एच पूर्व व एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, एम पश्चिम, एल, एन, एस आणि टी

१९ एप्रिल - एम पूर्व

Post Top Ad

test
test