मेट्रोला विरोध नको म्हणून १० इंटरचेंज ठिकाणी वाढीव एफएसआय - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

29 April 2018

मेट्रोला विरोध नको म्हणून १० इंटरचेंज ठिकाणी वाढीव एफएसआय


मुंबई - मुंबईचा विकास आरखडा बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप केला जात असताना मेट्रोच्या कामात नागरिकांचा अडथळा नको म्हणून १० ठिकाणी वाढीव एफएसआय देण्यात आला आहे. वाढीव एफएसआय देऊन नागरिकांना खुश करण्याचा आराखड्यातून करण्यात आला आहे.

मुंबईत सध्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा मेट्रो १ मार्ग कार्यान्वित आहे. भविष्यात कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो ३, मानखुर्द-डीएन नगर मेट्रो २, वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४, अंधेरी ते दहिसर मेट्रो ७ या मार्गांचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे भविष्यात मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा वेगवान होणार आहे. मात्र, या मेट्रो मार्गिका जेथे एकमेकांना कनेक्ट होतील अथवा टर्मिनल असू शकेल तेथील इंटरचेंजेसची सुविधा असणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि विनादगदग पार पडू शकतो. मात्र, या सुविधा उपलब्ध करताना तेथील स्थानिकांकडून कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होऊ नये, यासाठी विकास नियंत्रक नियमावलीनुसार मेट्रो स्थानकापासूनच्या ५०० मीटर परिसरातील रहिवाशांना विशेष एफएसआय देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मेट्रोचा विस्तार करताना अंधेरी ते दहिसर दरम्यानच्या १० ठिकाणांंना वाढीव एफएसआय देण्याचा निर्णय विकास आराखड्यात घेण्यात आला आहे.

Post Top Ad

test