मुंबई - महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना उंदीर अनेक वेळा घडले आहेत. पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. जोगेश्वरी येथील महापालिकेच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात एका रुग्णाच्या डोळ्याला उंदीर चावल्याची घटना समोर आली आहे. २७ वर्षीय परविंदर गुप्ता असे त्या रुग्णाचे नाव आहे. गुप्ता यांच्यावर सध्या ट्रॉमातील आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत.
परविंदर गुप्ता यांच्यावर ठाण्यातील हायलंड या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. खाजगी रुग्णालयात उपचाराचा १० लाख रूपये खर्च आला होता. रुग्णालयाचे बिल जास्त होत असल्यामुळे गुप्ता कुटुंबियांनी परविंदरला २१ एप्रिलला जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालयात दाखल केले होते. परविदंर गुप्ता यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्यांना आयसीयूत ठेवण्यात आले होते. रुग्णालयात सफाईचे काम काढल्यामुळे त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्याचवेळी परविंदर यांच्या डोळ्याला उंदराने चावा घेतल्याचे परविंदरचे वडील रामप्रताप गुप्ता यांनी सांगितले.
यावर रुग्णास उंदीर चावल्याच्या प्रकाराबाबत ट्रॉमा रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले असून असे काहीच घडले नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. रुग्णालयात परविंदर यांच्या अंगावरुन उंदीर गेला होता मात्र, तो त्यांना चावला नाही. त्याचा डोळा काही दिवसांपासून लालसर आहे. परविंदर गुप्ता यांचे रुग्णालयातील ४ डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीही केली आहे. मात्र, सर्व वैद्यकीय अहवाल नॉर्मल असल्याच रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि पेशंटचे नातेवाईक ट्रॉमा रुग्णालयाची बदनामी करून खोटे आरोप करत असल्याचा आरोप ट्रॉमा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बछाव यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment