लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करा, श्रमसाफल्य योजनेची घरे द्या - प्रकाश आंबेडकर

JPN NEWS
मुंबई - मुंबई महापालिकेत चतुर्थ श्रेणीत घाणीचे काम करणाऱ्या कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात, तसेच त्यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेनुसार घरे देण्यात यावीत इत्यादी मागण्या मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केल्या, या मागण्यांसाठी आंबेडकर यांनी पालिका आयुक्तांची नुकतीच भेट घेतली. 

या भेटीदरम्यान मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या २०१६ ते २०२५ या कालावधी करीता वेतनवाढीच्या मागणीपत्रावर विचार करावा, कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा योजना त्वरीत चालु करावी, 19 सप्टेंबर 2011 च्या करारांच्या अनुषंगाने वेतन निश्चिती थकबाकी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर द्यावी,  सफाई कामगारांना घाण भत्ता देण्यात यावा, घाणीचे घाण काम करणाऱ्या कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार पी .टी. केस लागू करावी, शैक्षणिक भत्याचे वाटत परिपत्रकान्वये करावे, डीसी 1 रद्द करून भविष्यनिर्वाह निधी कामगार - कर्मचाऱ्यांना लागू करावा, ज्या कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू आहेत त्या सर्वाना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेनुसार घरे देण्यात यावीत अशा मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह कामगार संघाचे सरचिटणीस सुभाष पवार, जेष्ठ चिटणीस संजीवन पवार उपाध्यक्ष, चंद्रकांत मोहिते, सिद्धार्थ कदम, कोषाध्यक्ष भिमराव पवार, सहचिटणीस सुहास मर्चंडे,  अनंत पवार, वॉर्ड चिटणीस व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते
Tags