Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

व्हॉट्सअॅपवरही आता ग्रुप कॉलची सुविधा

नवी दिल्ली - व्हॉट्सअॅपने व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलपाठोपाठ आता ग्रुप कॉलची सुविधाही उपलब्ध केली आहे. व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल या दोन्ही पर्यायांमध्ये ग्रुप कॉलची सुविधा देण्यात आली असून, त्याद्वारे एकाच वेळी कमाल चार जणांना परस्परांशी संवाद साधता येईल. आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही प्रणालींवर ही नवी सुविधा उपलब्ध आहे. जगभरातील दीड अब्ज युजर्सना ग्रुप कॉलिंग सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ‘कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी कमाल चार युजर्सना परस्परांशी ग्रुप कॉलद्वारे संवाद साधता येईल. त्यासाठी प्रथम एका व्यक्तीला व्हॉइस किंवा व्हिडीओ कॉल करून, त्यानंतर उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असलेल्या ‘अॅड पार्टिसिपंट’ या नवीन बटणावर क्लिक केल्यास इतर युजर्सना या कॉलमध्ये समाविष्ट करता येईल,’ असे व्हॉट्सअॅपने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ग्रुप कॉल हे एंड-टू-एंड इन्क्रीप्टेड आहेत. जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या नेटवर्कमध्ये काम करण्याच्या दृष्टीने या कॉलिंग फीचरची रचना करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपने २०१४ मध्ये व्हॉइस कॉलिंगची, तर २०१६ मध्ये व्हिडीओ चॅटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली होती. 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom