भायखळा जेलमधील महिला कैद्यांना अन्न विषबाधा

JPN NEWS

मुंबई - भायखळा जेलमधील महिला कैद्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. यापैकी ८५ महिला कैद्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री जेवणानंतर काही महिला कैद्यांना उलट्या, मळमळ, पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. तुरुंग प्रशासनाच्यावतीने वैद्यकीय उपचार देण्यात आले पण त्यामुळे त्रास कमी न झाल्याने त्यांना जेजे रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. या सर्व कैद्यांवर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

एका पुरुष कैद्याला तीन दिवसांपूर्वी कॉलरा झाला होता. हा आजार पसरू नये म्हणून आरोग्य विभागाने सर्व कैद्यांना औषधे दिली होती. शुक्रवार सकाळपासून अनेक महिला कैद्यांनी उलट्या, जुलाब होत असल्याची तक्रार केली. आरोग्य विभागाच्या लोकांनी तपासणी केली. त्यांच्या शिफारशीनुसार महिला कैद्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
राजवर्धन सिन्हा, महानिरीक्षक  
Tags