हॉटमिक्सची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी

JPN NEWS

मुंबई - मुंबई महापालिकेकडून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हॉटमिक्स उत्पादनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार झाला आहे. कॅगने सादर केलेला एक अहवाल विधानसभेत मांडला गेला आहे. यामधून हा प्रकार उघड झाला आहे. यामुळे या घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी समिती नियुक्त करून सदर चौकशी समितीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर सादर करावा, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे .

सन २०११ पासून गेल्या सात वर्षांमध्ये मुंबईतील रस्ते बांधणी आणि खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या कारखान्यात तब्बल १३ कोटी २१ लाख १८ हजार किलो हॉटमिक्सचे उत्पादन केले गेले. यासाठी पालिकेने सुमारे ६६ कोटीहून अधिक खर्च केला आहे. पालिकेकडून रस्त्यांसाठी अशा प्रकारे खर्च करूनही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. हॉटमिक्सच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे. 
Tags