घनकचरा खात्यातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 July 2018

घनकचरा खात्यातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन


मुंबई- मुंबई मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांनाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पालिका प्रशासनाने अवलंबलेल्या उदासीन धोरणाच्या निषेधार्थ शेकडो कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले आहे.

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यात ३०००० कायम व २५००० कंत्राटी कामगार मुंबईची साफसफाई करणे, दररोज निर्माण होणारा हजारो टन कचरा वाहून नेणे तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम करतात .यात ५० टक्के महिला कर्मचारी आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना पालिका चौक्यांमध्ये पाणी ,वीज ,शौचालय ,बाथरूम विश्रांतीगृह आदी सुविधा पुरवत नाही. या कर्मचाऱ्यांना लागणारी सुरक्षा साधणे पुरवणे त्यांना पदोन्नती देणे याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे सदर कामगारांची मोठी गैरसोय होत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा आरोप म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे सरचिटणीस ऍड .नवनाथ महारनवर यांनी केला आहे. दरम्यान, आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २३ ते २८ जुलै या कालावधीत सदर पर्यवेक्षीय कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत , असेही त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad