मुंबई विमानतळावर ६ किलो सोने जप्त - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

19 August 2018

मुंबई विमानतळावर ६ किलो सोने जप्त

मुंबई - मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागातील एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी ६ किलो सोने जप्त केले. या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १ कोटी ६७ लाख ६५ हजार ९०६ रुपये आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

शनिवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकवरुन एअर इंडियाच्या विमानाने हरीश कुमार चोप्रा आणि करण कुमार हे दोन प्रवासी आले. विमानतळाच्या गेटमधून घाई गडबडीत बाहेर पडत असतानाच कस्टमच्या अधिकाऱयांनी त्यांची चौकशी केली असता अंगझडती दरम्यान प्रत्येकी १ किलो वजनाचे ६ सोन्याची बिस्किटे त्यांच्याकडे आढळली. ही सोन्याची बिस्किटे दिल्लीहून आलेल्या अजय कुमार या प्रवाशाला देण्यात येणार होती. त्यापूर्वीच कस्टमच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत मुद्देमालासह आरोपींना अटक केली.

Post Top Ad

test