अजित वाडेकर यांचे निधन - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

15 August 2018

अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई - भारताचे माजी क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. निधन समयी ते ७७ वर्षांचे होते. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ज्या प्रमुख नावांचा उल्लेख जेव्हा केला जाईल, त्यात अजित वाडेकर यांचे नाव नेहमीच अग्रेसर असेल. एक फलंदाज म्हणून तसेच यशस्वी कर्णधार म्हणून त्यांनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव नोंदवले होते. यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, प्रशिक्षक, प्रशासक अशा विविध स्तरावर त्यांनी भारतीय क्रिकेटची सेवा केली होती. १९६६ ते १९७४ अशा आठ वर्षांच्या कालखंडात वाडेकरांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. पण या छोट्या कालावधीतही त्यांनी केलेली कामगिरी सदोदित लक्षात राहणारी अशीच आहे. भारताला परदेशातील पहिलावहिला ऐतिहासिक विजय मिळवून देणारे कर्णधार म्हणून वाडेकर यांचा उल्लेख क्रिकेटच्या इतिहासात झाला आहे. अभ्यासात हुशार असलेले वाडेकर हे इंजिनीअर होणार होते, पण त्यांना क्रिकेटची जास्त आवड होती त्यामुळे त्यांना क्रिकेटकडे ओढले. बारावा खेळाडू म्हणून ते रुईया कॉलेजातून खेळू लागले. १९७१च्या त्या वर्षात त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला मात देण्याचा पराक्रम केला. इंग्लंडलाही धूळ चारली. म्हणूनच भारताला परदेशात जेव्हा जेव्हा यश मिळाले त्याची मुहूर्तमेढ वाडेकर यांनीच रोवले. मन्सूर अली खान पतौडी यांच्याकडून कर्णधारपदाची सूत्रे विजय मर्चंट यांच्या निर्णायक मताच्या आधारे वाडेकर यांच्याकडे आली होती. तो निर्णय वाडेकरांनी अचूक ठरवत परदेशात देदीप्यमान यश संपादन केले.

Post Top Ad

test