धनगर आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चा - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

19 August 2018

धनगर आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चा


मुंबई - धनगर आरक्षणाबाबत भारत अगेन्स्ट करप्शनने न्यायालयात केलेली जनहित याचिका व न्यायालयाने याबाबत घेतलेली महत्त्वपूर्ण भूमिका पाहता धनगर समाजाला आता लवकरच आरक्षण मिळेल, अशी आशा आहे. मात्र सरकारने या प्रकरणी दिरंगाई करू नये म्हणून २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदान, मुंबई येथे भाजपा सरकारला समाजाची हजारो निवेदने देत 'आक्रोश मोर्चा' काढण्यात येणार असल्याचा इशारा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. 

सन २०१४ ला ९ दिवसांचे पुण्यात केलेले महत्त्वपूर्ण आंदोलन, १ ऑगस्ट २०१६ ला विधानभवन मुंबई येथे काढलेला मोर्चा, आतापर्यंत विविध जिल्ह्यांत केलेली २२४ आंदोलने, महत्त्वाचे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयात केलेली जनहित याचिका या सर्व पार्श्वभूमीवर आता धनगर आरक्षणाचा प्रश्न योग्य मार्गावर आला आहे. धनगर बांधवांनी २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई येथे येताना 'आरक्षण द्या' अशा आशयाची निवेदन घेऊन यावीत. कायदेशीर बाबीसाठी आपण न्यायालयात भूमिका मांडत आहोतच. त्यावेळी ही निवेदने मोठी भूमिका बजावणार आहेत. 'धनगड' ऐवजी 'धनगर' ही दुरुस्ती करून अनुसूचित जमातीच्या सवलतीची मागणी १९७५ पासून झाली आहे. राज्य सरकारने १९८९ व १९१४ मध्ये केंद्र सरकारला दुरुस्ती करण्याची शिफारस केली होती. ही शिफारस केंद्र सरकारने मान्य केली असल्याची दाट शक्यता आहे, असे पाटील म्हणाले. सरकारने या प्रकरणी आता तरी गांभीर्याने विचार करत या भटक्या समाजाकडे लक्ष द्यावे. अन्यथा यापुढची आंदोलने अधिक तीव्र करावी लागतील, असे पाटील म्हणाले..

Post Top Ad

test