तोतया पोलिसांची टोळी गजाआड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 August 2018

तोतया पोलिसांची टोळी गजाआड


ठाणे - खाजगी वैद्यकीय क्लिनिकला लक्ष्य करणाऱ्या पाच तोतया पोलिसांची टोळी डायघर पोलिसांनी गजाआड केली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. या सर्वांकडे पोलीस अधिकारी असल्याचे बनावट कार्ड्स सापडली असून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप बाबुराव कांबळे (३२), अशोक देविदास शिरवडे (३०), शैलेश मारुती यादव (३१), अनिता गोपाळ थापा (४०), सविता ज्ञानेश्वर जाधव (३०) अशी नवी मुंबईत वास्तव्य करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी नदीम शाहजहा बेग यांचे कौसा, मुंब्रा येथे क्लिनिक आहे. तोतया पोलिसांनी गुरुवारी स्वत:जवळील गर्भपाताचे एमटीपी किट रुग्णालयात ठेवून डॉ. बेग यांना ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. आम्ही पोलीस अधिकारी आहोत. कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल आणि तो टाळायचा असेल, तर २ लाख रुपये द्यावे लागतील, अशी अट घातली होती. महिला आरोपी सविता जाधव यांनी शुक्रवारी डॉ. बेग यांना फोन करून मी क्राईम इन्व्हेस्टिगेटर आहे, असे सांगून दुपारी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. मात्र, डॉ. बेग यांना संशय आला. त्यामुळे डॉ. बेग मुंब्रा मेडिकल असोशिएशनच्या डॉक्टरांसह कोपरखैरणे पोलीस ठाण्यात पोहोचले. सविता जाधव यांनी पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये बसण्याची सूचना केली. या हॉटेलमध्ये पाच आरोपींपैकी संदीप कांबळे व्यतिरिक्त सर्वच उपस्थित होते. पोलीस ठाण्याच्या जवळ थांबलेल्या अन्य डॉक्टरांना सूचना करत डॉ. बेग यांनी प्रथम आरोपी संदीप कांबळेला जेरबंद करून हॉटेल्समध्ये आणले. त्यानंतर कोपरखैरणे पोलिसांना याबाबतची माहिती कळवण्यात आली.

Post Bottom Ad