Type Here to Get Search Results !

हार्दिक पटेलसह १४० कार्यकर्त्यांना अटक


अहमदाबाद - पाटीदार अनामत आंदोलन समितीचा (पास) युवा नेता हार्दिक पटेल व त्याच्या १४० समर्थक कार्यकर्त्यांना रविवारी अहमदाबाद येथे पोलिसांनी अटक केली आहे. २५ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या आमरण उपोषणासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही कारवाई केली आहे. विनापरवानगीने उपोषणाची हाक देण्यात आल्यामुळेच हार्दिक पटेल व त्याच्या सहकाऱ्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. राजकोट येथून अहमदाबादला उपोषणासाठी जाणारे २६ जण आणि पाटीदार आंदोलनाच्या १९ निमंत्रकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. येत्या २५ ऑगस्टपासून अहमदाबाद येथील निकोल परिसरात आमरण उपोषण करण्याची घोषणा हार्दिक पटेलने केली आहे. या संदर्भात त्याने राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांना पत्र लिहिले आहे. पटेल समुदायाला आरक्षण देण्याची हार्दिक पटेलची मुख्य मागणी आहे. आंदोलन करणे हा घटनादत्त अधिकार आहे, असा दावा हार्दिक पटेलने केला आहे.
Tags

Top Post Ad

Below Post Ad