तीन वर्षांत एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत घट - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

03 August 2018

तीन वर्षांत एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत घट

नवी दिल्ली - मागच्या तीन वर्षांच्या काळात देशात एचआयव्ही झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे आढळून आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्र्यांनी दिली आहे. लोकसभेत डॉ. अंशुल वर्मा आणि अशोक महादेवराव नेते यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जगत प्रकाश नड्डा म्हणाले की, २०१५-१६ या वर्षी देशात एचआयव्हीबाधित रुग्णांची संख्या २,००,४६५ होती. या संख्येत २०१६-१७ या वर्षी कपात होऊन ही संख्या १,९३,१९५ झाली होती. या संख्येत २०१७-१८ मध्ये आणखी कपात होऊन ही संख्या १,९०,७६३ इतकी नोंदविण्यात आली होती. ते म्हणाले की, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा राज्यांमध्ये एचआयव्हीची नवी हॉटस्पॉट आढळून आली आहेत. ही वाढ इंजेक्शनद्वारे मादक द्रव्य व्यक्ती आणि असुरक्षित यौनसंबंधांची जोखीम पत्करल्यामुळे झाली आहे.आरोग्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सरकार निर्बंध, सल्ला, चौकशी आणि उपचार सेवा संबंधित पॅकेज

Post Top Ad

test