Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

कोंकण मंडळाच्या सदनिका सोडतीला मुदतवाढ

मुंबई - कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक ) नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ९०१८ सदनिकांच्या विक्रमी सोडतीकरिता लोकाग्रहास्तव आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून नागरिक दि. १८ ऑगस्ट, २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. शनिवार, दि. २५ ऑगस्ट, २०१८ रोजी वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात सकाळी १० वाजता संगणकिय सॊडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी दिली. 

 नवीन वेळापत्रकानुसार अर्जदार दि. १६ ऑगस्ट, २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदणी करू शकतात . नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता अंतिम मुदत दि. १८ ऑगस्ट ,२०१८ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. तसेच ऑनलाईन अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत दि. १८ ऑगस्ट, २०१८ रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत असणार आहे. अनामत रक्कम एनईएफटी व आरटीजीएसद्वारे भरण्याकरिता चलन निर्मिती दि. १६ ऑगस्ट ,२०१८ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केली जाऊ शकते. तसेच अर्जदार दि. १८ ऑगस्ट, पर्यंत चलन बँकेत सादर करू शकतात. कोंकण मंडळातर्फे दि . १७ जुलै, २०१८ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर अर्ज भरण्याकरिता नागरिकांना केवळ २४ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. करिता म्हाडा कार्यालयात दूरध्वनी वरून नागरिकांनी केलेल्या मागण्यांनुसार सदरील मुदतवाढीचा निर्णय म्हाडा प्रशासनाने घेतला आहे. 
 
मंडळातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे या सोडतीमध्ये यशस्वी अर्जदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी म्हाडा मुख्यालयात दि. २७ ऑगस्ट २०१८ ते ०१ सप्टेंबर २०१८ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत असलेले योजना संकेत क्रमांकामधील २७०, २७१, २७२ व २७५ विजेत्यांनी कागदपत्रांसह हजर रहावे, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.

सोडतीसाठी स्विकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या वेबसाईटवर दि. २२ ऑगस्ट, २०१८ रोजी सायंकाळी ६.०० वाजता केली जाणार असून सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी दि. २३ ऑगस्ट, २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom