हवा, ध्वनिप्रदूषणाने मुंबईकर त्रस्त - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 August 2018

हवा, ध्वनिप्रदूषणाने मुंबईकर त्रस्त


मुंबई - मुंबईतील वाहतूक समस्या, विविध बांधकामे, विकासकामे यामुळे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण यामुळे मुंबईकर त्रस्त झाले असल्याचे नॅशनल एन्व्हार्यनमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च अर्थात 'नीरी'ने अलीकडेच दिलेल्या अहवालात म्हटले आहे. रस्ते आणि रेल्वेमुळे सर्वाधिक ध्वनिप्रदूषण होत असल्याचे त्यांनी अहवालात म्हटले आहे. .

या प्रदूषणावर नीरीने काही उपाय सुचवले आहेत.गाड्यांच्या काचा बंद करणे, घरामध्ये एसी आणि एअर प्युरिफायर लावणे याकडे लोकांचा कल अधिक होत आहे. त्यामुळेही अर्थातच प्रदूषणामध्ये भर पडत आहे. मात्र, यासंदर्भात सखोल अभ्यास झालेला नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे..

राष्ट्रीय महामार्गांवर कामाच्या दिवशी दिवसा ८५ डेसिबलपर्यंत आवाजाची पातळी जाते, तर रात्री हा आवाज ७८.४ डेसिबल इतका असतो. सुट्टीच्या दिवशी हाच आवाज ७६.५ डेसिबल इतका असतो, तर रात्री तो वाढून ७८.४ डेसिबल एवढा होतो. मुख्य रस्त्यांवर कामाच्या दिवशी आवाज ८८.७ डेसिबल इतका असतो, तर सुट्टीच्या दिवशी ८५.९ डेसिबल इतका होतो. मुख्य मार्गांपासून दूर राहणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळेल याची खात्री नसते. हा आवाज कामाच्या दिवशी दिवसा ७७.७ डेसिबल तर सुट्टीच्या दिवशी ७७.९ डेसिबल इतका असतो, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे..

मुंबईत गाड्यावंरील हॉर्नबाबत कडक नियम नसल्याने हॉर्नसाठी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होत नाही. हायवेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक ठिकाणी आवाजाची पातळी उंचावलेली आहे. मुंबईकर नागरिक ट्विटरवर तक्रारी करतात, आवाज फाऊंडेशनकडे तक्रारी करतात. मात्र, याची दखल घेतली जात नाही. पुलांवर साऊंड बॅरिअर शीट घातली पाहिजे, असे मत आवाज फाऊंडेशनच्या संस्थापक सुमैरा अब्दुलली यांनी व्यक्त केले आहे.

Post Bottom Ad