महाराष्ट्राला ५१ पोलीस पदके - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

14 August 2018

महाराष्ट्राला ५१ पोलीस पदके

नवी दिल्ली - स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलीस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. यामध्ये 8 शौर्य पदके, 3 राष्ट्रपती पोलीस पदके आणि 40 पोलीस पदकांचा समावेश आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशातील एकूण 942 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी विविध पदके जाहीर केली. देशभरातून शौर्यासाठी 2 राष्ट्रपती पोलीस पदके, 177 पोलीस पदके, उत्कृष्ट सेवेसाठी 88 राष्ट्रपती पोलीस पदके आणि 675 पोलीस पदके जाहीर झाली आहेत. यात महाराष्ट्रातील 51 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना ही पदके जाहीर झाली आहेत. तसेच राज्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन अधिकाऱ्यांनाही पोलीस पदके जाहीर झाले आहेत. मुंबई येथील राखीव पोलीस दलाचे निरीक्षक राधेश्याम पांडे आणि नागपूरचे उपनिरीक्षक सुरेश कुमार थापा यांनाही पोलीस पदके जाहीर झाली आहेत.

राज्यातील ३ पोलीस अधिकारी –कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके
१) शिवाजी तुळशीराम बोडखे, सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर, नागपूर.
२) दयानंद हरिश्चंद्र ढोमे, पोलीस निरीक्षक, चतुश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, पुणे.
३) बाळु प्रभाकर भवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्ष, नाशिक शहर.

८ पोलीस अधिकारी –कर्मचाऱ्यांना शौर्य पदके जाहीर
१) शितलकुमार अनिल कुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक.
२) हर्षद बबन काळे, पोलीस उपनिरीक्षक.
३) प्रभाकर रंगाजी मडावी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल.
४) महेश दत्तु जाकेवार, पोलीस कॉन्स्टेबल.
५) अजितकुमार भगवान पाटील, पोलीस उपनिरीक्षक.
६) टिकाराम संपतराय काटेंगे, नायब पोलीस कॉन्सटेबल.
७) राजेंद्र श्रीराम तडमी, पोलीस कॉन्स्टेबल.
८) सोमनाथ श्रीमंत पवार, पोलीस कॉन्स्टेबल.

उत्कृष्ट सेवेसाठी राज्यातील ४० पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस पदके
१) नविनचंद्र दत्ता रेड्डी,पोलीस उपायुक्त, झोन 10, अंधेरी, मुंबई.
२) डॉ.पंजाबराव वसंतराव उगले, पोलीस अधीक्षक,दहशतवादी विरोधक दस्त,नाशिक
३) श्रीकांत व्यंकटेश पाठक, कमांडर, राज्य राखीव पोलीस बल गट-3,दौंड
४) सारंग दादाराम आवाड, पोलीस उपायुक्त, पुणे महानगर विकास प्राधिकरण, पुणे.
५) रविंद्र महादेव महापडी, सहायक कमांडर, राज्य राखीव पोलीस बल गट-11, नवी मुंबई
६) शिरीष सुधाकर सावंत, सहायक पोलीस आयुक्त, गावदेवी विभाग, मुंबई शहर, मुंबई
७) सुदर्शन लक्ष्मणराव मुंढे, पोलीस उपअधिक्षक, उपविभाग कर्जत, अहमदनगर.
८) धुला ज्ञानेश्वर तेले, पोलीस उपअधिक्षक, इओडब्ल्यू, नांदेड.
९) विठ्ठल नामदेव मोहिते, पोलीस निरीक्षक, एमटी, स्टेशन नवी मुंबई.
१०) सतीष गणपत मयेकर, पोलीस निरीक्षक, एटीएस,मुंबई.
११) गौतम कृष्णा गायकवाड,आर्म्ड पोलीस निरीक्षक,राज्य राखीव पोलीस बल गट-5 नागपूर.
१२) प्रिनम नामदेव परब, पोलीस निरीक्षक,पंतनगर पोलीस स्टेशन,मुंबई शहर,मुंबई.
१३) योगेंद्र चंद्राकांत पाचे, पोलीस निरीक्षक,एलटी मार्ग पोलीस स्टेशन,मुंबई शहर,मुंबई.
१४) अजय खाशाबा जाधव, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा,मुंबई शहर,मुंबई.
१५) गणपत दिनकर पिंगळे,पोलीस निरीक्षक,चितळसर पोलीस स्टेशन,ठाणे शहर,मुंबई
१६) राजेंद्रसिंग प्रभुसिंग गौर,पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,जालना.महाराष्ट्र
१७) अनंत महिपतराव कुलकर्णी,पोलीस निरीक्षक,जिल्हा स्पेशल गुन्हे शाखा,उस्मानाबाद.
१८) विठ्ठल खंडूजी कुबडे,पोलीस निरीक्षक,छिंदवाड पोलीस स्टेशन,पुणे शहर,पुणे.
१९) दिगंबर केशव झाकडे,पोलीस उपनिरीक्षक,कोथरूड पोलीस स्टेशन पुणे शहर,पुणे.
२०) किशोर मुकुंद अत्रे,पोलीस उपनिरीक्षक,बिनतारी संदेश कक्ष,पुणे.
२१) दत्तात्रय बाबुराव मासाळ,सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस मुख्यालय,कोल्हापूर.
२२) रविंद्र बळीराम सपकाळे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस मुख्यालय,जळगांव.
२३) अरूण संपत अहिरे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,अंबड पोलीस स्टेशन नाशिक शहर नाशिक.
२४) कृष्णाजी यशवंत सावंत,सहायक पोलीस उपनिरीक्षक,गुन्हे शाखा,मुंबई.
२५) अरीफखान दाऊदखान पठाण,ड्रायव्हर,सहायक पोलीस उपनिरीक्षक,डीसीपी झोन दुसरे कार्यालय नाशिक शहर.नाशिक.
२६) शेख जलील उस्मान,सहायक पोलीस उपनिरीक्षक,पीसीआर,अहमदनगर.
२७) सुभाष नाना जाधव,सहायक पोलीस उपनिरीक्षक,नाशिक रोड पोलीस स्टेशन,नाशिक शहर
२८) चंद्रकांत सुर्यभान इंगळे,हेड कॉन्स्टेबल,गुन्हे शाखा पुणे शहर,पुणे.
२९) सय्यद अफसर सय्यद जहुर,पोलीस हेड कॉन्सटेबल,स्थानिक गुन्हे शाखा,परभणी.
३०) सिद्धराय शिवाप्पा सत्तीगिरी,पोलीस हेड कॉन्सटेबल,डोंगरी पोलीस स्टेशन,मुंबई शहर,मुंबई.
३१) नेताजी दत्तात्रय देसाई,पोलीस हेड कॉन्स्टेबल,लाच लुचपत प्रतिबंध शाखा,वरळी मुंबई.
३२) प्रभू कोंडीबा बेलकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल,गुन्हे शाखा,मुंबई शहर,मुंबई.
३३) संतोष संभाजीराव दरेकर,पोलीस हेड कॉन्सटेबल,गुन्हे शाखा,मुंबई शहर,मुंबई.
३४) रमाकांत देवराव बाविस्कर,पोलीस हेड कॉन्सटेबल,पीसीआर,नागपूर.
३५) वसंत शंकर पन्हाळकर,पोलीस हेड कॉन्सटेबल,स्थानिक गुन्हे शाखा,कोल्हापूर.
३६) नानाकुमार सुरेशप्रसाद मिसार,शोध अधिकारी ,राज्य गुप्तचर विभाग,नाशिक.
३७) अविनाश राजाराम लिंगावळे,पोलीस हेड कॉन्सटेबल,गुन्हे शाखा विभाग,मुंबई शहर,मुंबई.
३८) पांडुरंग अनंत शिंदे,पोलीस हे्ड कॉन्सटेबल,डीबी मार्ग पोलिस स्टेशन,मुंबई.
३९) चिमाजी धोंडिबा बाबर,पोलिस हेड कॉन्सटेबल,पोलिस प्रशिक्षण केंद्र,लातूर.
४०) रमेश शामराव सुर्वे,पोलीस हेड कॉन्स्टेबल, धारावी पोलीस स्टेशन मुंबई शहर,मुंबई.

Post Top Ad

test