Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

सुनिता विल्यम्सची अमेरिकेच्या ह्युमन स्पेसफ्लाईट प्रोग्रॅममध्ये निवड


वाॅॅशिंग्टन – भारतीय वंशाची नासातील अंतराळवीर सुनिता विल्यम्सचा अमेरिकेच्या ह्युमन स्पेसफ्लाईट प्रोग्रॅममध्ये समावेश करण्यात आला आहे. बोईंग आणि स्पेस एक्स यांनी एकत्रित विकसित केलेला कमर्शियल स्पेसक्राफ्ट म्हणजे हा प्रोग्रॅम आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला या अंतराळवीरांना व्होयेज, ऑस्ट्रेलिया मधील आंतरराष्ट्रीय स्पेसस्टेशन मध्ये नेण्यात येणार आहे. एकूण ९ अंतराळवीरांमध्ये सुनिता विल्यम्स देखील निवडली गेली आहे. २०११ पासून पहिल्यांदाच आम्ही अमेरिकन रॉकेट्सवर अमेरिकन अंतराळवीरांना पाठविण्याच्या तयारीत आहोत, असे नासाचे प्रशासक जिम ब्राईडेनस्टाईन यांनी अंतराळवीरांची नावे जाहीर करताना सांगितले. २०१४ मध्ये बोईंग आणि स्पेसएक्स यांनी नासासोबत ६.८ बिलियन डॉलर्सचा एक करार केला होता. नासातील सर्व क्र्यू सदस्यांना स्पेस स्टेशन पर्यंत पोहोचविणारे स्पेसक्राफ्ट बनविण्याचा हा करार होता.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom