व्हेनेएझुएला / काराकस – व्हेनेएझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडूरो काल राजधानी काराकास येथे सैनिकांसमोर भाषण देत होते. त्याचवेळी त्यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने तिथे ड्रोन हल्ला करण्यात आला. माडूरो हल्ल्यातून थोडक्यात बचावले. तेथेच असलेल्या सैनिकांनी हा हल्ला परतवून लावला.
व्हेनेएझुएलाचे माहिती मंत्री जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, हा हल्ला राष्ट्रपतींना लक्ष्य करून मुद्दामुनच करण्यात आला असल्याची शक्यता आहे. हल्ल्यात सात जण गंभीर जखमी आहेत. साधारण संध्याकाळी पावणे सहा वाजता हा हल्ला झाला. आकाशात असणाऱ्या ड्रोनलाच स्फोटके लावण्यात आली होती. अचानक आवाज आल्याने सर्वांनी वर पाहिले आणि ड्रोनचा स्फोट झाल्याचे लक्षात आले.