Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

ताडदेव आरटीओ कार्यालयाचा कायापालट होणार


मुंबई - काही दिवसांपूर्वी ताडदेव आरटीओला आग लागली होती. त्यामुळे वाहनचालकांचे काही प्रमाणात हाल झाले होते. खुप जुन्या असलेल्या या आरटीओ कार्यालयाचा कायापालट करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. दक्षिण भागातील सर्वात जास्त बिझी म्हणून ताडदेव आरटीओची ओळख आहे. त्यामुळे येथे नवीन इमारतीसोबतच इतर सुविधा देण्याचा ३० कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, सध्या हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.

काही दिवसांपूर्वी ताडदेव आरटीओच्या कार्यालयाला आग लागली होती. त्या आगीत सुमारे १५ खोल्या भस्मसात झाल्या होत्या. या आगीत ५० संगणक, ७ हजार परवाना असलेले छापील स्मार्टकार्डही जळाली होती. त्या वेळी सेवा पूर्ववत राहण्यासाठी त्याच परिसरात दुसऱ्या बॅरेकमध्ये संगणकीय व इंटरनेट जोडणी, परवाना चाचणी, त्यांचे वाटप व अन्य कामकाजाची सोय करण्यात आली होती. ताडदेव आरटीओत दिवसाला ३५० पर्यंत इच्छुक वाहनचालक शिकाऊ परवाना व त्याच्याशी संबंधित कामासाठी येत असतात. त्यामुळे हे महत्त्वाचे आरटीओ कार्यालय आहे. ताडदेव कार्यालयात परवान्याशी संबंधित येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मुंबईतील अंधेरी आरटीओत नवीन इमारत व अन्य सुविधा उपलब्ध केल्यानंतर ताडदेव कार्यालयाचे रूपडे कधी पालटणार, असा प्रश्न होता. त्यानुसार परिवहन विभागाने साधारण ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित असणारा प्रस्तावही बनवला व तो मंजुरीसाठी काही महिन्यांपूर्वी पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तो अमलात आणला जाणार आहे. नवीन इमारत बांधताना त्यामध्ये बऱ्याच सुविधाही वाहनधारकांसाठी दिल्या जाणार आहेत.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom