अमली पदार्थ - महिला तस्करांचा बोलबोला - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

03 September 2018

अमली पदार्थ - महिला तस्करांचा बोलबोला


मुंबई - अमली पदार्थाची निमिर्ती आणि पुरवठा करणाऱ्या बड्या पॅडलर्सवर कारवायांचा दणका चालू ठेवल्यानंतर अमली पदार्थविरोधी कक्षाने शहरातील अमली पदार्थांच्या किरकोळ विक्रेत्यांना रडावर घेतले आहे. त्यातही महिला विक्रेत्यांवर पथकाची विशेष नजर आहे. ऑगस्ट महिन्यात शहरात विविध ठिकाणी कारवाया करून पथकाने ११ छोटया-मोठया महिला विक्रेत्यांना बेडया ठोकल्याने या तस्करीत महिला तस्करांचा मोठ्या प्रमाणांत बोलबोला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षी अमली पदार्थविरोधी पथकाने एमडीचे उत्पादक, वितरक, बडे पुरवठादारांना शिताफीने अटक केली. त्यापाठोपाठ चरस, गांजा आणि कोकेनच्या वितरण साखळीविरोधात धडक मोहीम उघडून ६५ गुन्हे नोंद केले आहेत. आरोपींना अटक केली गेली आणि त्यांच्याकडून मोठया प्रमाणात अमली पदार्थाचा साठा हस्तगत केला गेला. या कारवाईमुळे सध्या अमली पदार्थाचा मोठा साठा पोहोचता करण्यास निर्माते, वितरक आणि त्यांचे वाहक (कॅरिअर) नकार देतात. त्यामुळे आता पथकाने शहरातील छोटया-मोठया विक्रेत्यांविरोधात आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या वर्षी विशेषत: जुलै, ऑगस्ट महिन्यांपासून पथकाच्या विविध कक्षांनी हद्दीतल्या किरकोळ प्रमाणातील अमली पदार्थ थेट ग्राहकांना उपलब्ध करून देणाऱ्या विक्रेत्यांची धरपकड सुरू केली आहे. ऑगस्ट महिन्यात पथकाने भांडुप, वरळी, गोरेगाव, सांताक्रूझ, वांद्रे या परिसरात छापे टाकून २१ विक्रेत्यांना अटक केली. त्यात ११ महिलांचा समावेश आहे. वरळी पथकाने नाशिकहून गांजाचा साठा मुंबईत आणणाऱ्या लता चौरे या महिलेला बेडया ठोकल्या. तिच्याकडून १० किलो गांजा हस्तगत केला. लताने गेल्या दोनेक महिन्यांमध्ये मुंबईच्या १५ ते २० वाऱ्या केल्या. आरोग्यसेविकेच्या वेशात तिने गांजाचा किरकोळ साठा दडवून मुंबईत आणल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. तिने हा साठा वरळीतल्या किरकोळ विक्रेत्यांच्या मागणीनुसार आणला होता. त्यापैकी राणी बरसैया या विक्रेतीला अटक केली. राणी पूर्वी गावठी दारूचा गुत्ता चालवत असे. मात्र कालांतराने ती गांजा विक्रीत उतरली. तसेच गावठी दारूचा गुत्ता चालवणाऱ्या बहुतांश महिला सध्या अमली पदार्थ विक्रीत सक्रिय आहेत.

Post Top Ad

test