Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

एफबीआयच्या नावाने गंडवणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा भंडाफोड

नोएडा (उत्तर प्रदेश) : एफबीआयचे अधिकारी असल्याचे सांगत अमेरिकन नागरिकांना धमकावत पैसे उकळणाऱ्या एका बोगस कॉल सेंटरचा भंडाफोड करण्यात नोएडा पोलिसांना यश आले. या कारवाईत तब्बल १२६ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. सेक्टर ६३ येथील एका कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणूक होत असल्याची माहिती खबऱ्यांनी दिल्यानंतर गुरुवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी कॉल सेंटरमधून अनेक संगणक, हार्डडिस्क, लॅपटॉप, चेकबुक जप्त करत अमेरिकन नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या १२५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कॉल सेंटरचे कर्मचारी गुगल व इतर साधनांच्या मदतीने अमेरिकन नागरिकांची माहिती गोळा करीत असत. त्यानंतर एफबीआयचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्या राष्ट्रीय ओळखपत्रातील त्रुटी दुरुस्त करण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात असे. तसेच चाइल्ड पोर्नोग्राफीसह विविध खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकीही या नागरिकांना दिली जायची. अशाप्रकारे गत काही महिन्यांत हजारो डॉलर कॉल सेंटरच्या विविध बँक खात्यांत जमा करण्यात येत असल्याची माहिती चौकशीदरम्यान समोर आल्याचे यावेळी वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. अजय पाल यांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom